

जुन्या कपड्यांना नवसंजीवनी
बेलापूरच्या प्रक्रिया केंद्राद्वारे महिलांना मिळणार रोजगार
वाशी, ता. १ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात जुने सुस्थितीतील कपड्यांचे संकलन हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या उपक्रमाला नवी मुंबईतील नागरिकांनी प्रतिसाद देत वापरलेले चांगल्या स्थितीतील कपडे मोठ्या प्रमाणात जमा केले. यामध्ये तब्बल ८१३.३ किलो जुने कपडे संकलित करण्यात आले. या कपड्यांना नवजीवन देण्यासाठी बेलापूर येथील टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्रात पाठवण्यात आले.
बेलापूर येथे वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्प प्रकल्पामध्ये जुने कपडे गोळा करून त्यांचे वर्गीकरण, प्रक्रिया तसेच त्यापासून नव्या वस्तूंची निर्मिती केली जाते. यामुळे क्षेपणभूमीवर जाणारा कापडी कचरा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. नवी मुंबई महापालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाउंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये महिला बचत गटांतील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या उपक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, प्रोजेक्ट मुंबईचे अधिकारी रोहित फडतरे, टिसर ट्रस्टच्या वैशाली कदम आणि मंडळाचे सभासद यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.