वाशी खारेपाट भागातील पाणी टंचाई निवारणासाठी प्रांत कार्यालय येथे आढावा बैठक

वाशी खारेपाट भागातील पाणी टंचाई निवारणासाठी प्रांत कार्यालय येथे आढावा बैठक
Published on

पाणीटंचाई निवारणासाठी आढावा बैठक
आमदार रवींद्र पाटील यांचे पाच दिवसांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश
पेण, ता. २ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याने ती निवारण्यासाठी सोमवारी (ता.२) प्रांत कार्यालय येथे आमदार रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
खारेपाट परिसरातील वाशी, वडखळ, बोरी, शिर्की आणि मसद या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली. वाढीव पाणीपुरवठ्यासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली.
या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र पाटील यांनी कामांमध्ये गती आणण्याची गरज अधोरेखित करत, येत्या पाच दिवसांत प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले. तसेच, कामांमध्ये होणारा विलंब टाळण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान, कांदळे आदिवासीवाडी येथे गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पानेड येथील सिडकोच्या जलवाहिनीवरून वाशी खारेपाट विभागासाठी सुमारे ५०० मीटर लांबीची पाइपलाइन जोडण्याचा प्रस्ताव असून, त्यास प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश मिळण्यास झालेल्या विलंबाबाबतही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. संबंधित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.
या बैठकीला प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, विकास म्हात्रे, वाशी सरपंच संदेश ठाकूर, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील, कांदळे सरपंच मुरलीधर भोईर, बाजार समिती संचालक काशिनाथ पाटील आदींसह एमजीपी, सिडको तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व खारेपाटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com