

रोहा-अष्टमी नगरपालिकेला अत्याधुनिक मैला टँकर उपलब्ध
रोहा, ता. २ (बातमीदार) : रोहा-अष्टमी शहरात मैला साफसफाईसाठी नगरपालिकेकडे टँकर उपलब्ध नसल्याने नागरिकांना भाड्याने टँकर आणताना दुप्पट खर्च करावा लागत होता.
ही गैरसोय दूर करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेला अत्याधुनिक मैला टँकर मिळाला आहे. त्यामुळे स्वच्छता कामे अधिक प्रभावीपणे होणार असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापुढे हे वाहन सोसायट्या व इतरांसाठी भाडेतत्त्वावरही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे यांनी दिली.
या वेळी उपाध्यक्ष व आरोग्य सभापती अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर,महेश कोलटकर, रवींद्र चाळके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक अजीत मोरे, प्रशांत कडू, माझ सवाल,अभियंता ओंकार भुरण, अधिकारी श्रीनिवास पाटील, नीलेश चाळके आदी उपस्थित होते..
फोटो कॅप्शन : मैल टँकर वाहन लोकार्पण करताना नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपाध्यक्ष अहमद दर्जी आदी मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.