इंधनावरील मुक्त बंदीमुळे अडचण

इंधनावरील मुक्त बंदीमुळे अडचण
Published on

इंधनावरील मुक्त बंदीमुळे अडचण
बोईसर (वार्ताहर) : पेट्रोलपंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदीमुळे ट्रॅक्टर, पॉवर टिलरवर अवलंबून असलेले शेतकरी, शेतीपूरक व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कुणबी सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदी उठवण्याची मागणी होत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदी लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या पेट्रोलपंपांवर गर्दी कमी झाल्याचे दिसून येत असले तरी कॅनमधून डिझेल मिळत नसल्याने शेतीकामे ठप्प होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून पेट्रोलपंपचालकांना आवश्यक सूचना द्याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, अशी मागणी कुणबी सेना पालघर जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, जिल्हा सरचिटणीस गंगाराम घरत तसेच तालुकाध्यक्ष मार्तंड पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com