

बेक केमिकल्स कंपनीतील १८ कंत्राटी कामगारांना कायम दर्जा
रोहा, ता. १ (बातमीदार) : कामगारांच्या हितासाठी झटणाऱ्या जनरल मजदूर सभा या संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बेक केमिकल्स कंपनीतील १८ कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
जनरल मजदूर सभा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या करारानुसार या कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम सेवेत सामावून घेण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी सहा कामगारांना कंपनीने स्वतःच्या रोलवर कायम कामगार म्हणून नियुक्त केले होते. नुकतेच आणखी सहा कामगारांना कायम कामगारांचा दर्जा देऊन त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. संबंधित कामगारांना अधिकृत पत्रांचे वितरण करण्यात आले.
ही पत्रे जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर, अध्यक्षा संज्योत वढावकर, उपाध्यक्ष शामकांत जोशी यांच्या हस्ते कामगारांना प्रदान करण्यात आली. या वेळी कंपनीतर्फे साईट हेड डायरेक्टर समीर पवार, सीनिअर मॅनेजर एचआर गजानन बामणे, असिस्टंट मॅनेजर शैलेश निंबरे, युनियनचे सचिव जगदीश उपाध्ये, खजिनदार प्रशांत शेट्ये, रायगड संपर्कप्रमुख सुहास खरीवले उपस्थित होते. या वेळी बेक कमेटी अध्यक्ष संजय शेळके, राजेश बानुगडे, विजय जाधव, सतीश चावरेकर, संदीप रटाटे आणि कामगारवर्ग उपस्थित होता.
फोटो कॅप्शन : बेक कंपनीतील कामगारांना पत्र देताना जनरल मजदूर सभा संघटनेचे सरचिटणीस संजय वाढवकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.