

टिटवाळ्यात वीजपुरवठा खंडित
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) : बल्याणी गावात सुरू असलेल्या गटार साफसफाईच्या कामात जेसीबीचालकाच्या निष्काळजीचा मोठा फटका टिटवाळा परिसरातील हजारो नागरिकांना बसला आहे. जेसीबीने थेट २२ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी तोडल्याने दुपारपासून संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे, याच कामादरम्यान महापालिकेची मुख्य जलवाहिनीही फुटल्याने नागरिकांवर आता ''दुहेरी'' संकट ओढावले आहे.
रवींद्र आर्केड, रवींद्र रेजन्सी, इंदिरानगर, बल्याणी गाव, मोहिली, टेकडी, तलाव परिसर, गणेश नगर सोसायटी, आंबेडकर चौक आणि आंबिवली रोड या परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. बल्याणी येथे दुपारच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने गटार साफ करण्याचे काम सुरू होते. या वेळी जमिनीखालील वीजवाहिनीचा अंदाज न आल्याने २२ केव्हीची मुख्य केबल तुटली. या धक्क्याने परिसरातील वीज गुल झालीच, पण त्याचवेळी पालिकेची पाण्याची पाइपलाइनही विस्कळित झाली. ऐन उन्हाळ्यात वीज आणि पाणी दोन्ही एकाच वेळी गेल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
दुरुस्तीसाठी लागणार वेळ
महावितरणच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र, २२ केव्हीसारखी उच्चदाब वाहिनी आणि जलवाहिनी या दोन्ही गोष्टी पूर्ववत करण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजची रात्र टिटवाळाकरांना अंधारात आणि पाण्याविना काढावी लागण्याची भीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.