महिलांची पाण्यासाठी वणवण

महिलांची पाण्यासाठी वणवण
Published on

सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. १ : ‘प्रत्येक घराला नळ, प्रत्येक घराला पाणी’ हे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने २०२२ मध्ये सुरू केलेली जलजीवन मिशन योजना मुरबाड तालुक्यात निधीअभावी रखडल्याचे चित्र समोर आले आहे. २०२४पर्यंत महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अद्याप बदललेली नाही. परिणामी, मुरबाड तालुक्यातील तब्बल २०६ पाणीपुरवठा योजनांना याचा फटका बसला आहे.

तालुक्यात जलजीवन मिशनअंतर्गत १८९ आणि इतर मिळून एकूण २०६ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र त्यापैकी केवळ ६० ते ७० योजना पूर्ण झाल्या असून, त्यातील ६४ योजना सुरळीत सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जगदीश बनकरी यांनी दिली. उर्वरित योजना निधीअभावी अर्धवट अवस्थेतच थांबल्या आहेत.
अनेक ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. परिणामी, ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील महिलांना आजही डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर बनते.

या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी देण्याचे नियोजन होते. मात्र, निधीअभावी कामे रखडल्याने घराघरांत पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट अपूर्णच राहिले आहे. योजनेला आता २०२८ पर्यंत मुदतवाढ दिल्याने महिलांना आणखी काही वर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, निधीअभावी कामे थांबल्याने स्थानिक ठेकेदारही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून योजना पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

..........................
जलजीवन मिशन योजनांची प्रगती टक्केवारीत

एकूण योजना काम सुरू = १८९
०% ते २५% प्रगती = ९
२५% ते ५०% प्रगती = २३
५०% ते ७५% प्रगती= ५२
७५% ते ९९% प्रगती= ४५
१००% प्रगती = ६०
......................................

खोपीवली ग्रामपंचायत हद्दीतील खुटारवाडी आदिवासी गावातील जलजीवन योजनेचे दोन वर्षांपासून काम अपूर्णच आहे. त्यामुळे आजही आमच्या आदिवासी महिलांचा डोक्यावरचा हंडा उतरला नाही.
- प्रियंका वाघ, ग्रामपंचायत सदस्य, खोपीवली (खुटारवाडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com