

कळंबोलीमध्ये अनधिकृत व्यवसायांवर कारवाई
पनवेल, ता. १ (कळंबोली) ः कळंबोली प्रभाग समिती ‘ब’मध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पालिकेच्या पथकामार्फत सोमवारी (ता. ३०) कारवाई करण्यात आली. यामुळे कळंबोलीतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील चारही प्रभागातील अनधिकृत झोपड्या, शेड, फळ-भाजी स्टॉल्सवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार प्रभाग समिती ‘ब’मध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करत स्टॉल्स उचलून नेण्यात आले. तसेच, सोमवारी रोडपाली बस डेपो येथे बसणारा आठवडा बाजारही बंद करण्यात आला आहे. याबरोबरच कळंबोलीमधील फुटपाथवरील अनधिकृत फळे, भाजी विक्रेत्यांवरही कारवाई करून पदपथ मोकळे करण्यात आले. आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनूसार उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.