६० वर्षांचा प्रस्ताव नगरविकास खात्याने फेटाळला

६० वर्षांचा प्रस्ताव 
नगरविकास खात्याने फेटाळला
Published on

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा कालावधी ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव पहिल्याच महासभेत सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला; मात्र महापालिकेने पाठवलेला हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने फेटाळला आहे.

सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नवी मुंबई महापालिकेत निवडणुकीनंतर सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर पहिलीच महासभा २० फेब्रुवारीला झाली. या महासभेत महापालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती कालावधी ५८ वरून वाढवून ६० वर्षांचा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने फेटाळला आहे. सरकारची पूर्वपरवानगी न घेता तसेच सेवा विनियम विद्यमान कायदे व राज्य सरकारच्या नियमांशी विसंगत असल्याचा ठपका ठेवत नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत संबंधित ठराव प्रथमदर्शनी निलंबित केला आहे. महासभेने पाठवलेला पहिलाच प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने अधिकारी आणि कर्मचारीवर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सभागृह नेत्यांची नाराजी
याबाबत पालिकेतील सभागृह नेते सागर नाईक यांनी खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत भेट घेऊन नवी मुंबई शहराच्या हिताच्या भूमिकेतून घेतलेल्या निर्णयाला मंजुरी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. आयुक्तांमार्फत पाठवलेला हा प्रस्ताव सरकारने फेटाळून एक प्रकारे शहर विकासाची पोकळी निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com