अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदलांची तयारी

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदलांची तयारी
Published on

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदलाचे वारे?
मागील वर्षातील चुका सुधारण्याची ‘शिक्षण’ची तयारी
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रकियेत मागील काही वर्षांत अनेक त्रुटी समोर आल्या. त्यात सुधारणा करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने सुरू केली असून, लवकरच सुधारित नियमावली जारी होणार आहे.
शिक्षण विभागाने २०२५-२६ या वर्षी फेब्रुवारीपर्यंत लांबलेली प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांना झालेला त्रास आणि त्या माध्यमातून संस्थांचालकांचे साधले गेलेले हित या सर्वांचा आढावा प्रस्तावित सुधारणांसाठी घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षीपासून राज्यात सर्वत्र अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश, विभागाच्याच आदेशाला हरताळ फासत तब्बल १५ हून अधिक फेऱ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया लांबली. ११ ऑगस्ट २०२५ला राज्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गांना सुरुवात झाली होती; तरीही काही संस्थाचालकांचे हित साधण्यासाठी फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रवेशाच्या विशेष फेऱ्या आयोजित केल्या. अकरावीसाठी‍ इनहाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक या कोट्यांचे नियम धाब्यावर बसविण्यात आले. यावरून शिक्षण विभागावर जोरदार टीका झाल्याने आता या चुका सुधारण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.
----
प्रवेश सीईटीच्या धर्तीवर?
नव्या सुधारणांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही सीईटीच्या धर्तीवर काही फेऱ्यांमध्येच पूर्ण करण्यासाठी कडक नियमावली आणली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन कसे होईल तसेच संस्थाचालकांचे हित साधण्यासाठी कोणतीही कृती झाल्याचे आढळल्यास थेट संचालकस्तरावर कारवाईची तरतूद केली जाणार आहे.
-------
अशा झाल्या चुका...
- तीन विशेष फेऱ्यांनंतर आरक्षणाचा आढावा न घेताच राखीव जागा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध केल्या.
- विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांना मान्यता देणाऱ्या केंद्राचा अभाव
- ऑप्शनसाठी नेमकी माहिती न मिळाल्याने चुकीचे अर्ज भरले गेले.
- अल्पसंख्याक महाविद्यालयांना अखेरच्या फेरीपर्यंत मोकळे रान दिले.
- उशिरा प्रवेश झालेल्यांचे अभ्यासक्रम अर्धवट राहिल्याने शैक्षणिक नुकसान झाले.
- इंटिग्रेटेड कोर्स चालविणाऱ्या एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर विभागाने कारवाई केली नाही.
---------
प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यात प्रवेशाचे टप्पे कमी करण्याबाबत सूचना केली आहे.
- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com