

पुलाच्या कामामुळे जलवाहिन्यांची गळती
मालवणीत हजारो लिटर पाणी वाया
मालाड, ता. १ (बातमीदार) : मालवणीतील शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर गेट क्रमांक सहा येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे जलवाहिन्यांना गळती लागून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. या परिस्थितीचा फायदा घेत अनेकांनी अनधिकृत जलजोडण्या केल्याचे समोर आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गेट क्रमांक सहा येथील पुलाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान १२ इंची मुख्य जलवाहिनीसह इतर पाइपलाइनना भगदाडे पडली आहेत. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
अनधिकृत जलजोडण्यांमुळे अधिकृत जोडणी असलेल्या नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असून, काही ठिकाणी दूषित पाण्याचाही पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत स्थानिकांनी पालिकेच्या पी-उत्तर विभागाकडे तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
पालिकेकडून काही अनधिकृत कनेक्शन तोडण्यात आले असले, तरी कारवाईनंतर पुन्हा राजकीय हस्तक्षेपातून अनधिकृत जलजोडण्या सुरू केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.
आमच्याकडे अधिकृत जोडणी असूनही पाणी कमी दाबाने येते, तर अनधिकृत जोडणाऱ्यांचेच फावते.
- नसीम अन्सारी, रहिवासी
गळती थांबवण्यात आली असून, सुमारे १० अनधिकृत जोडणी तोडण्यात आली आहे.
- इंद्रजित दुबे, कनिष्ठ अभियंता, जलकामे खाते, पी-उत्तर विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.