कल्याणमध्ये ५ एप्रिलला ‘कल्याण केसरी’ स्पर्धा

कल्याणमध्ये ५ एप्रिलला ‘कल्याण केसरी’ स्पर्धा
Published on

कल्याण, ता. १ (वार्ताहर) : शिवजयंतीनिमित्त कुस्ती मल्लविद्या महासंघ आणि ‘श्री प्रतिष्ठान’ यांच्या वतीने रविवारी (ता. ५) भव्य ‘कल्याण केसरी’ कुस्ती स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राऊंड) येथे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत रंगणार आहे. स्पर्धेसाठी महासंघाचे अध्यक्ष गणेश मानुगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपनेते विजय साळवी, नगरसेवक दिपेश म्हात्रे, संकेश भोईर, पैलवान संग्राम काबंळे, सरपंच जगन पाटील, नगरसेविका अपर्णा भोईर, वैभव भोईर, संतोष भोईर, उमेश बोरगावकर, स्वप्नाली केणे, विशाल गारवे आणि गणेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com