

देवनार वीज प्रकल्प लवकरच सुरू होणार
८० टक्के काम पूर्ण; प्रशासनाची माहिती
मुंबई, ता. १ : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने देवनार येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. देवनार येथे दररोज ६०० टन घनकचऱ्यापासून सात मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. हा प्रकल्प पुढील जून महिन्यात कार्यान्वित होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला.
देवनार कचराभूमीवर हजारो मेट्रिक टन कचरा जमा झाला आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम कंत्राटदाराला दिले आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते; मात्र विविध परवानग्या मिळविण्यात उशीर झाल्याने कंत्राटदाराला नऊ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत वीज प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित २० टक्के काम परवानग्या उपलब्ध झाल्यावर पूर्ण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष वीजनिर्मितीचे काम पुढील महिन्यापासून करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
----
कसा असेल प्रकल्प?
- विंडो कम्पोस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर
- मे. चेन्नई एमएसडब्ल्यू प्रा. लि.कडे प्रकल्पाचे कंत्राट
- दररोज सात मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.