

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम
मंत्री शेलार यांचे आढावा बैठकीत सर्वंकष विचाराचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करा. तसेच स्टेडियमसाठी योग्य जागेची निवड करताना कनेक्टिव्हिटी, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्वंकष विचार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी दिले.
नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईत स्पोर्टस् सिटीच्या प्रस्तावित क्षेत्रामध्ये स्टेडियम उभारणीचा पर्यायही विचाराधीन आहे. त्या ठिकाणी सुमारे ५० टक्के जमीन आधीच संपादित झाली आहे. उर्वरित जमीन टप्प्याटप्प्याने संपादित करून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले आहेत.
समन्वयाने काम करा
या प्रकल्पासाठी आवश्यक आराखडा तयार करण्याबरोबरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले. मात्र त्यापूर्वी जागेचे निश्चितीकरण आणि मूलभूत नियोजन पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. दरम्यान, या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत प्राथमिक अहवाल सादर करून त्यानंतर पुनरावलोकन बैठक घेण्यात येणार आहे. स्टेडियम प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.