रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्याने अपघाताची भीती

रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्याने अपघाताची भीती
Published on

रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्याने अपघाताची भीती
मालाड, ता. २ (बातमीदार) : मालाडमधील मालवणी गेट क्रमांक ८ येथील अंबोजवाडी परिसरात मुख्य रस्त्यावरील गटाराचे लोखंडी झाकण तुटल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेले गटार उघडे पडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या मार्गावर सतत वाहतूक सुरू असल्याने वाहनांचे चाक गटारात अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः पादचारी आणि दुचाकीस्वारांसाठी हा धोका अधिक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक गाय गटारात पडल्याची घटना घडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली होती. या घटनेतून परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होते. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तात्पुरत्या उपाययोजनेतून त्या ठिकाणी बांबू लावून इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कायमस्वरूपी उपाय म्हणून मजबूत लोखंडी झाकण बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पालिका ‘पी उत्तर’ विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गटाराचे झाकण बदलावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com