विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन

विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन
Published on

सम्म-अजीवा फाउंडेशनतर्फे महिलांना मार्गदर्शन
ग्राहक सहकारी संस्थेच्या संकल्पनेवर भर
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : स्थानिक महिलांना सशक्त करण्यासाठी आणि ग्राहक सहकारी संस्थेच्या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी सम्म-अजीवा फाउंडेशनतर्फे नुकताच महिला दिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कल्याण पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरी येथील तारांगण हॉलमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि भंते आनंद शांतिरक्खो यांच्या मार्गदर्शनाने झाली. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक आर्थिक प्रयत्न आणि सहकारी व्यवस्थेची कास धरणे काळाची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेविका समिधा बासरे आणि नगरसेविका माया कांबळे यांनी प्रमुख उपस्थिती लावत समाज सशक्तीकरणाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्या बालाडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर सुनीता साळुंखे यांनी त्यांना साथ दिली. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. अश्विनी शिरसाठ आणि अरविंद वाघमारे यांनी केले. अखेर उपाध्यक्ष तथा संयोजिका निशा गाडे यांनी आभार मानले. ग्राहक सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक क्रांतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम कल्याण परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

आर्थिक स्वावलंबनाचा मूलमंत्र
प्रमुख वक्ते अ‍ॅड. प्रमोद तायडे यांनी महिलांचे सशक्तीकरण आणि त्यात ग्राहक सहकारी संस्थांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. स्वप्नाली मेश्राम आणि प्रा. अश्विनी शिरसाठ यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. एकजूट आणि संघटित प्रयत्नांमुळेच महिलांचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असा सूर या मान्यवरांनी मांडला. कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सामूहिक प्रयत्नांतून आयोजन
सोहळ्याला सम्म-अजीवा फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र टकसांदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समिती सदस्य प्रगती सपकाळे, सत्यशीला श्यामकुंवर, वैशाली घाडगे आणि स्वाती बच्छाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com