

लघुशंकेसाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा मोबाईल लंपास
कल्याण, ता. २ (बातमीदार) : शहरातील पूर्व परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, भरदिवसा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. श्री मलंगगड रस्त्यावरील नांदिवली पेट्रोलपंपाजवळ एका रिक्षाचालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.
संबंधित रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन नांदिवली येथील पेट्रोलपंपावर सीएनजी भरण्यासाठी आला होता. गॅस भरून झाल्यानंतर त्याने रिक्षा काही अंतरावर उभी केली आणि तो जवळच लघुशंकेसाठी गेला. हीच संधी साधून तिथे दबा धरून बसलेल्या चोरट्याने रिक्षात हात साफ केला. चालक रिक्षापासून दूर गेल्याचे पाहताच चोरट्याने अत्यंत शिताफीने रिक्षात प्रवेश केला आणि मोबाईल फोन तसेच जवळील रोख रक्कम घेऊन पळ काढला. काही वेळातच चालक रिक्षाजवळ परतला असता, त्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.