

कल्याण एसटी आगार व्यवस्थापकपदी चेतन देवधर
राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे जंगी स्वागत
कल्याण, ता. २ (बातमीदार) : कल्याण आगाराच्या आगार व्यवस्थापकपदी चेतन देवधर यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने पुष्पगुच्छ आणि एसटी डायरी देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
चेतन देवधर यांनी यापूर्वी डहाणू येथे आगार व्यवस्थापक म्हणून यशस्वी कार्यकाळ भूषवला आहे. त्यांना राज्य परिवहन महामंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही मार्गी लागतील, असा विश्वास स्वागत समारंभाप्रसंगी संघटनेचे ठाणे विभागीय अध्यक्ष योगेंद्र कदम यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ठाणे विभागीय कार्याध्यक्ष दत्ता अडागळे, पप्पू काकडे, राकेश जोगी, संदीप भांगळे, भरत सानप आणि नितीन खंडागळे यांसह इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.