४३१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली

४३१ कोटींच्या मालमत्ता कराची वसुली
Published on

अभय योजनेशिवायही भरघोस वसुली
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत ४३१ कोटींची भर; ८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ३१ मार्चअखेर सुमारे ८६ टक्के करवसुली करण्यात प्रशासनाला यश आले असून, याबद्दल महापालिकेने करदात्यांचे आभार मानले आहेत.

महापालिकेच्या महसुलाचा मुख्य आधार असलेल्या मालमत्ता करातून २०२५-२०२६ या वर्षासाठी ५०० कोटींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आयुक्त डॉ. अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोसावी आणि उपायुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांनी समन्वय साधत सातत्याने आढावा बैठका घेतल्या. या प्रयत्नांचे फलित म्हणून मार्चअखेरपर्यंत ४३१.४१ कोटी रुपयांची विक्रमी करवसुली पूर्ण झाली आहे.

वसुलीला गती
विशेष म्हणजे, यंदा कोणतीही अभय योजना राबवली नसतानाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कर भरला आहे. नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच करवसुलीला मोठी गती मिळाली, अशी प्रतिक्रिया कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.

ऑनलाइन कर भरण्याचे आवाहन
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि नागरिकांनी दाखवलेली तत्परता यामुळेच ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, २०२६-२०२७ या नवीन आर्थिक वर्षासाठी अधिकाधिक नागरिकांनी रांगेत उभे न राहता ऑनलाइन पर्यायाचा वापर करून कर भरावा, असे आवाहनही केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com