विद्युत उपकेंद्रच्या इमारतीची दुरावस्था

विद्युत उपकेंद्रच्या इमारतीची दुरावस्था
Published on

विद्युत उपकेंद्रच्या इमारतीची दुरावस्था
नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः कोपरखैराणे येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून दुर्घटनेचा धोका संभवतो. या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिकेत हांडेपाटील यांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
कोपरखैराणे सेक्टर १६, १७, २२ व २३ येथील महावितरणच्या विद्युत उपकेंद्राची इमारत खराब व जीर्ण झाली आहे. इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी सिमेंट व प्लास्टर निघालेले आहे. तसेच संरचनेची स्थिती वाटत असून पावसाळ्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुनिकेत हांडेपाटील यांनी म्हंटले आहे.
या उपकेंद्रातून परिसरातील नागरिकांना नियमित वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या इमारतीची सुरक्षितता व मजबूती महत्त्वाची आहे. कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी तसेच कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपकेंद्राची तात्काळ तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी सुनिकेत हांडेपाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com