वाशी येथील रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी; नागरिक संतप्त

वाशी येथील रस्ते कामामुळे वाहतूक कोंडी; नागरिक संतप्त
Published on

वाशीतील रस्तेकामामुळे वाहतूक कोंडी
नागरिक संतप्त; प्रशासनाकडे कारवाईची मागणी
जुईनगर, ता. २ (बातमीदार) : वाशी सेक्टर १४ आणि १५ परिसरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मर्चन्ट जिमखाना ते पीकेसी रुग्णालयासमोरील रस्त्यावर सुरू असलेल्या या कामात योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाशी सेक्टर १४ आणि १५ मार्गावर रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु वाहनचालकांच्या मार्गदर्शनासाठी आवश्यक सूचनाफलक लावलेले नाहीत. तसेच कोणतीही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केले नसल्याने या मार्गावर मोठी कोंडी होत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपायही अपुरे असून, वाहतूक पोलिसदेखील तैनात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अनेक ठिकाणी अपघातच्या घटनादेखील समोर येत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले असून, लोकप्रतिनिधींवरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या मागण्या
नागरिकांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यामध्ये योग्य ट्रॅफिक नियोजन करणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवणे, जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करणे, तसेच लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणे यांचा समावेश आहे. नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गेल याअनेक दिवसांपासून परिसरात रस्त्याची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीचे नियोजन न केले गेल्याने आणि वाहतूक बदलाचे मार्गदर्शक फलक नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या कामामुळे परिसरात धूळीसह इतर समस्या सहन कराव्या लागत आहेत.
- प्रशांत खंडागळे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com