

अवैध रिक्षांवर पोलिसांचा बडगा
३० रिक्षांवर कारवाई ः एक जप्त
कामोठे, ता. २ (बातमीदार) : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात अवैध रिक्षा व्यवसायाला चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आरटीओच्या मदतीने बुधवारी (ता. १) शोधमोहीम राबवली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० रिक्षांवर बडगा उगारण्यात आला असून, एका मद्यपी चालकासह एका रिक्षावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी आणि नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. वाहतूक पोलिसांनी पनवेल रेल्वे स्थानक पूर्व व पश्चिम परिसरातील अवैध रिक्षाचालकांची पडताळणी केली. अवैध प्रवासी वाहतूक करणारे, फिटनेस, कालबाह्य इन्शुरन्स, विना लायसन्स, विना गणवेश रिक्षाचालक, तीव्र प्रकाशाची लाईट यावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १२० रिक्षांची तपासणी करण्यात आली, तर ३० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. तसेच एक रिक्षा जप्त केली. ड्रंक अँड ड्राइव्ह केल्याप्रकरणी एकावर कारवाई केली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
अतिरिक्त बसची सोय
पनवेल स्थानक परिसरात पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे अनेक रिक्षाचालक निघून गेले. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबई परिवहन विभागाशी संपर्क साधून तत्काळ अतिरिक्त बसची व्यवस्था केली आणि प्रवाशांना इच्छित स्थळी पाठवले. रात्रीच्या वेळी झालेल्या या मदतीमुळे प्रवाशांनी वाहतूक विभागाचे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.