केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोलीत विधी महोत्सव उत्साहात पार

केएलई कॉलेज ऑफ लॉ, कळंबोलीत  विधी महोत्सव उत्साहात पार
Published on

कळंबोलीत विधी महोत्सव उत्साहात
पनवेल ता. २ (बातमीदार) ः केएलई सोसायटीच्या कळंबोलीतील केएलई कॉलेज ऑफ लॉ येथे नुकताच वार्षिक विधी महोत्सव ‘स्पार्कल ७.०’ उत्साहात पार पडला. देशभरातील विविध विधी महाविद्यालयांतील १८० हून अधिक विद्यार्थ्यांनी या तीन दिवसीय महोत्सवात सहभाग घेतला होता. मूट कोर्ट स्पर्धेत ४४ संघांनी तर क्लायंट काउन्सेलिंग स्पर्धेत २० संघांनी भाग घेतला.
या महोत्सवातून विद्यार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेचे प्रत्यक्ष अनुकरण करत व्यावहारिक कौशल्ये, वकिली तंत्र आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला माजी जिल्हा न्यायाधीश न्यायमूर्ती विश्वनाथ व्ही. अंगडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अमिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. डब्ल्यू. संतोष कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. थुरैराजा, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम शिर्साट आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. ए. पाटील यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत सहशैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. मूट कोर्ट स्पर्धेत व्ही ई एस कॉलेज ऑफ लॉने विजेतेपद पटकावले, तर क्लायंट काउन्सेलिंग स्पर्धेत अलायन्स युनिव्हर्सिटीने बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com