

खेळता खेळता गणिताचा अभ्यास
वसई-विरार शहरात महापालिका उद्यान उभारणार
वसई, ता. २ (बातमीदार)ः किचकट, अनेकांची भंबेरी उडवणाऱ्या गणिताचा अभ्यास निसर्गरम्य वातावरणात करता येणार आहे. कारण वसई-विरार महापालिका उद्यानातून मुलांसाठी स्वछंदी वातावरण निर्माण करणार आहे.
वसई-विरार पालिका रस्ते, गटार, पाणी अशा पायाभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करते. तसेच महिला व बाल कल्याण योजनेतून विद्यार्थिनी, महिलांसाठी विविध योजना, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने उद्यान, तलाव सुशोभीकरण, संविधान पार्क, बर्ड पार्क, दिव्यांग पार्क गणिताचे धडे गिरवणारे उद्यान अशी आगळीवेगळी संकल्पना आणली आहे.
----------------------
उद्यानाची वैशिष्ट्ये
- प्रवेशद्वार गणितावर आधारित माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर उद्यानात गणित विषयाची साधन सामुग्री उपलब्ध केली जाणार असून, अभ्यासासोबत क्रीडांगण, घसरगुंडीसह अन्य खेळाला प्राधान्य दिले जाणार आहे.
- भूमिती विभागात गणित सूत्रे, घन, जिओ-डोम, आकारांचे स्टँड, रूपांतरण तक्ता असणार आहे. तर झोके, डोलक प्रतिकृती, घरगुंडीचा समावेश उद्यानात आहे.
----------------
वसई-विरार शहरात विज्ञान पार्क उभे करण्यात आला आहे. त्याच धरतीवर हसत खेळत गणिताचा अभ्यास सहज सोप्या भाषेत ज्ञात व्हावा उद्यानांची निर्मिती करण्याची संकल्पना आहे.
-अजीव पाटील, महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.