पथदिवे बंद असल्‍याने नागरिकांची गैरसोय

पथदिवे बंद असल्‍याने नागरिकांची गैरसोय
Published on

पथदिवे बंद असल्‍याने नागरिकांची गैरसोय
चेंबूर, ता. २ (बातमीदार) ः चेंबूर येथील बी. डी. पाटील मार्गावरील एचपीसीएल मुख्य गेटजवळील पथदिवे काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत असून, सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या मार्गावर सतत रहदारी असते. रात्रीच्या वेळी या परिसरात पूर्णतः अंधार पसरतो. त्यामुळे पादचारी, वाहनचालक तसेच कामावरून उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, असुरक्षिततेची भावनादेखील वाढत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महापालिका, वीज वितरण कंपनीकडे स्‍थानिकांनी पत्रव्यवहार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com