

अंबरनाथ (वार्ताहर) : ‘पंगुणी उथ्रम’ या उत्सवाचे औचित्य साधून अंबरनाथ शहरात रथयात्रा काढण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रथयात्रेची सुरुवात प्राचीन शिवमंदिर येथून करण्यात आली. यापूर्वी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर रथयात्रा गोविंद तीर्थ पूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, जैन मंदिर, मटका चौक, कल्याण-बदलापूर रोड आणि जठार चौक मार्गे मार्गक्रमण करत शास्त्रीनगर येथील स्वामीनगरमधील मुरुगन मंदिरात पोहोचली. येथे यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर व स्वामीनगर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली. भाविकांसाठी थंड पेयजल, शरबत, आईस्क्रीम; तसेच कलिंगडाचे वाटप करण्यात आले. उपक्रमासाठी शास्त्रीनगर परिसरातील बाळकृष्ण टुटा, सुब्रवेल, बोस्को, शिवलिंगम, फिरोज खान, कन्नादास, राजकुमारी आणि सुलताना आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.