बजरंगबलीला चांदीचा मुखवटा

बजरंगबलीला चांदीचा मुखवटा
Published on

बजरंगबलीला चांदीचा मुखवटा अर्पण
वाघाडी हनुमान मंदिरातील जन्मोत्सव उत्साहात साजरा

कासा, ता. २ (बातमीदार) : वाघाडी येथील हनुमान मंदिरात गुरुवारी (ता. २) हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे ४ वाजता विधिवत पूजाअर्चा करून दर्शन सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. तर जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला भजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या मंदिराची स्थापना सुमारे ५२ वर्षांपूर्वी झाली आहे. त्याबाबत एक अख्यायिकादेखील आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वड, पिंपळ व उंबर या वृक्षांच्या सान्निध्यात, तसेच प्राचीन इंद्र मंदिराजवळ हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती वाघाडीचे पोलिस पाटील मोरेश्वर सातवी यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवारी दुपारी येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गावकरी, शिक्षक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता.
----
चांदीचा मुखवटा अर्पण

यंदाच्या उत्सवात कासा येथील चेतन सोनार यांनी त्यांचे वडील अंबालाल सोनार व भाऊ मनोज सोनार यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीला चांदीचा मुखवटा अर्पण करण्यात आला. तसेच गेल्या १५ वर्षांपासून कोणतीही प्रसिद्धी न करता मंदिराचे वीजबिल भरणाऱ्या एका भाविकाचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास वाघाडी गावचे सरपंच प्रशांत सातवी, माजी पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी, ज्येष्ठ नागरिक महेंद्र पवार, महेश सोलंकी, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com