

वाशी, ता. ३ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील गणपती पाडा परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सध्या बंद अवस्थेत आहे. शहराच्या महत्त्वाच्या प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या या ठिकाणी असलेले रस्त्याच्या दुभाजकातील पथदिवे नादुरुस्त झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा संदेश देण्यासाठी काही काळापूर्वी या ठिकाणी विशेष विद्युत रोषणाई बसवण्यात आली होती. रात्रीच्या वेळी ही रोषणाई परिसराचे सौंदर्य खुलवण्यासोबतच प्रवाशांना आकर्षित करत होती. मात्र, मागील अनेक दिवसांपासून हे दिवे बंद असल्यामुळे या उपक्रमाचा उद्देशच अपूर्ण राहिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यासंदर्भात नगरसेविका ॲड. श्वेता काळे यांनी पालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करत तत्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे. नादुरुस्त दिव्यांची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे बसवावेत, तसेच शहराच्या प्रवेशद्वाराला पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने उजळवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.