उड्डाणपुलांच्या दुरुस्तीला वेग

उड्डाणपुलांच्या दुरुस्तीला वेग
Published on

उड्डाणपुलांच्या दुरुस्तीला वेग
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा

कासा, ता. २ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांना प्रवासादरम्यान त्रास होऊ नये म्हणून महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने विविध मार्गांवरील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

या राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपूल, घोळ, चिंचपाडा, धानिवरी व चारोटी उड्डाणपूलांसह इतर पुलांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच दुभाजक असेल किंवा रस्त्याच्या कडेला असणारे कठडे हे अनेक ठिकाणी ढासळले होते. महत्त्वाचे म्हणजे, पुलावर काही ठिकाणी लोखंडी रॉड हे बाहेरदेखील आले होते. तसेच पुलांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागत होता. यातून काही वेळा लहान-मोठे अपघातही घडलेत.

खासकरून महालक्ष्मी उड्डाणपुलावर उंच-सखल डांबरीकरण झाल्याने वाहनांचा तोल जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. आता महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणांहून भाविक तालुक्यात येत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये विशेष केमिकलचा वापर करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे वाहनचालकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. या दुरुस्ती कामासाठी अनेक स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचेही समोर आले आहे.

-----------------
अनेक ठिकाणांचा रस्ता अपूर्ण
दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने विविध उड्डाणपुलांच्या दुरुस्तीला सुरुवात केली असली तरी तालुक्यातील काही सेवा रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तसेच नव्याने केलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणही अत्यंत खराब दर्जाचे असल्याचे त्यांचे मत आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदारांनी निष्काळजी केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
-----------------
सध्या महालक्ष्मी उड्डाणपूल, चिंचपाडा व धानिवरी परिसरातील पुलांजवळील खड्डे आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल व आमच्यासारख्या वाहनचालकांना यातून दिलासा मिळेल.
- प्रणव घारपुरे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com