

अलिबागमध्ये हनुमान जयंती उत्साहात
अलिबाग, ता. २ (वार्ताहर) : श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा धार्मिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये गुरुवारी (ता. २) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील मारुती मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. अलिबाग शहरातील मारुती मंदिरासह तालुक्यातील पेझारी, चरी, सागाव, चेंढरे या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील मारुतीच्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जन्मानंतर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देण्यात आला. भाकरवड येथे हनुमान जयंतीनिमित्त सप्ताह, त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. सागाव, चेंढरे येथील हनुमान मंदिरात कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.