वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य

वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य
Published on

वाशी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य
दुर्गंधीने व्यापाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
तुर्भे , ता. ६ (बातमीदार) : एपीएमसी मार्केट वाशी येथील कांदा-बटाटा मार्केट आवारात गेल्या दोन दिवसांपासून साफसफाई न झाल्यामुळे अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बाजारातील ए व सी पाकळी तसेच सी व ई आणि ई व सी विभागांमध्ये कचऱ्याचा प्रचंड साठा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कचराकुंड्या पूर्णपणे भरून वाहत असून, सडलेले कांदे-बटाटे थेट रस्त्यावर पसरलेले आहेत. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
या अस्वच्छतेमुळे बाजारातील घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सडलेल्या भाजीपाला व कचऱ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्‍भवल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. नियमित स्वच्छता राखली जात नसल्याने अशा समस्या वारंवार निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर बाजार समितीने तात्काळ यंत्रणा हलवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी, कचरा उचलण्याची प्रक्रिया नियमित करावी आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com