

नेरूळमध्ये बुवाबाजीविरोधात जनजागरण प्रभातफेरी
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेलापूर-नेरूळ शाखेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल गार्डन परिसरात बुवाबाजीविरोधात जनजागरण प्रभातफेरी काढली होती. या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या फेरीत सहभागी कार्यकर्त्यांनी भोंदूबाबा खरातच्या निषेधार्थ आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणारे फलक हातात घेतले होते. अंधश्रद्धा निर्मूलन करा, भोंदूबाबांवर कठोर कारवाई करा, अशा घोषणा या वेळी दिल्या. प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच सामजिक माध्यमांवरून पसरत असलेल्या अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांना जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. दरम्यान, अशाच प्रकारच्या जनजागरण प्रभातफेरींचे आयोजन पुढील काही दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.