मालमत्ता कराची २५८ कोटी रुपयांची वसूली

मालमत्ता कराची २५८ कोटी रुपयांची वसूली
Published on

मिरा-भाईंदर पालिकेला लाभ
मालमत्ता कर, पाणीपट्टीचे ३६६ कोटी वसूल

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेने मालमत्ता कराची २५८ कोटी ४८ लाखांची वसुली केली आहे. तर पाणीपट्टीचे १०८ कोटी ४१ लाख तिजोरीत जमा आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. विकासकामे योग्य रीतीने सुरू ठेवण्यासाठी करवसुली आवश्यक असते. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने मालमत्ता कराची ३३४ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट नक्की केले होते. त्यापैकी २५८ कोटी वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. याचबरोबर चार कोटी ७५ लाखांचा थकीत कर वसुलीसाठी १२५ मालमत्ताही सील करण्यात आल्या आहेत.
---------------------------------
मालमत्ता करात २८ कोटींची वाढ
थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली नसताना मालमत्ता करात २८ कोटींची वाढ झाली आहे. वसुलीसाठी सर्व सार्वजनिक सुट्ट्या, शनिवार, रविवारीही सर्व पाणीपट्टी भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती.
----------------------------
ऑनलाइन भरण्याला प्रतिसाद
एक लाख ६७ हजार करदात्यांनी ऑनलाइन १३५ कोटी ७४ लाख रुपये तर रोख रक्कम, धनादेशद्वारे एक लाख ४६ हजार नागरिकांनी १२३ कोटी १० लाखांचा कर भरला आहे. ऑनलाइन कर भरण्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.
--------------------------------
पाणीपट्टी वसुलीत आघाडी
पाणीपट्टीची १०९ कोटी ७४ लाखांपैकी १०८ कोटी ४१ लाख म्हणजे ९८.७९ टक्के वसुली केली आहे. यासाठी प्रत्येक विभागात पथके स्थापन करण्यात आली होती. तसेच ९५ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com