

टीजेएसबी सहकारी बँकेचा विक्रमी प्रवास
२५ हजार कोटींचा टप्पा पार
ठाणे, ता. १ : देशातील अग्रगण्य आणि चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने २५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. या लक्षणीय यशामुळे बँकेच्या आर्थिक स्थैर्याला अधिक बळकटी प्राप्त झाली असून, सहकारी क्षेत्रातील तिचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या टीजेएसबी बँकेने विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या बँकेचे सात राज्यांमध्ये १६५ शाखांचे विस्तृत जाळे पसरलेले आहे. रिटेल, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा पुरवण्यावर बँकेने नेहमीच भर दिला आहे.
बँकेचे अध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली बँकेने ही प्रगती साधली आहे. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहककेंद्रित बँकिंग सेवांना प्राधान्य दिल्यानेच हा २५,००० कोटींचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे, असे बँकेने म्हटले आहे. या प्रवासात संचालक मंडळ आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.
डिजिटल सेवेवर भर देणार
उल्लेखनीय यशाबद्दल बँकेने आपल्या ग्राहकांचे आभार मानले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाची विशेष दखल घेतली आहे. आगामी काळात भौगोलिक विस्तार वाढवणे, डिजिटल सेवा अधिक सक्षम करणे आणि ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सेवा देणे, हे बँकेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.