सुर्या योजनेचा पाणी पुरवठा बंद

सुर्या योजनेचा पाणी पुरवठा बंद
Published on

सूर्या योजनेचा पाणीपुरवठा बंद
वसई-विरार शहरात १० तारखेपर्यंत शटडाऊन
वसई, ता. २ (बातमीदार)ः मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातर्फे सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे हाती घेतली आहे. याच अनुषंगाने शनिवारपासून १० तारखेपर्यंत होणाऱ्या शटडाऊनमुळे शहराला १५० दशलक्ष लिटर पाण्याची तूट निर्माण होणार आहे.
वसई-विरार शहर पालिकेला सद्यःस्थितीत ४०० दक्षलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. महापालिकेला सूर्या टप्पा १ व टप्पा ३ योजनेअंतर्गत २०० दक्षलक्ष लिटर तसेच एमएमआरडीएचा सूर्या ४०३ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा योजनेमधून १५० दक्षलक्ष लिटर असा ३५० दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दुसऱ्या टप्प्यातील तांत्रिक कामे पूर्ण करण्याकरिता ४ ते १० तारखेपर्यंत शटडाऊन घेण्यात आलेला आहे. या कालावधीत एमएमआरडीएकडून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
--------------------
पालिकेचे आवाहन
शहराला होणारा पाणीपुरवठा अपुरा, कमी दाबाने होणार असल्याने महापालिकेमार्फत प्रभागनिहाय पाणीपुरवठा वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० पर्यंत २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
---------------------------
दिनांक - झोननिहाय (२४ तासांकरिता पाणी बंद)
४ - विरार पूर्व, पश्चिम
५ - नालासोपारा पूर्व, पश्चिम
६ - नवघर, वसई
७ - विरार पूर्व, पश्चिम
८ - नालासोपारा पूर्व, पश्चिम
९ - नवघर, वसई
१० - विरार पश्चिम, नालासोपारा पश्चिम
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com