डोंबिवलीत पाच वर्षीय मुलीचा विनयभंग

डोंबिवलीत पाच वर्षीय मुलीचा विनयभंग
Published on

बालिकेचा विनयभंग
डोंबिवलीतील प्रकार; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ ः घरी खेळायला येणाऱ्या शेजाऱ्याच्या पाच वर्षांच्या बालिकेसोबत ४५ वर्षीय पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. बालिकेने आई-वडीलांना हा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात पुजाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च ते १ एप्रिलदरम्यान बालिकेचे आई-वडील कामाला गेले असताना पुजारी त्यांच्या घरी गेला. त्याने तिचा विनयभंग करत गैरवर्तन केले. बालिकेने पालकांना ही गोष्ट सांगितली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक टी. एस. पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com