मुंब्रा पुन्हा हादरले ; भरदिवसा गोळीबार

मुंब्रा पुन्हा हादरले ; भरदिवसा गोळीबार
Published on

मुंब्र्यात पुन्हा गोळीबार
एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मारेकऱ्याला शस्त्रासह अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मुंब्र्यात गुरुवारी कैलास नगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाला. बिस्मिल्ला चाळ, रूम नंबर २ येथे झालेल्या या प्रकारात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. याप्रकरणी एकाला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. ही घटना महिलेच्या छेडछाडीतून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी जयन शिवानंदन नायर (वय ५१) याच्या मानलेल्या बहिणीची काही व्यक्तींनी छेड काढल्याच्या कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर नायरने रागाच्या भरात गोळीबार केला. यात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख, समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने मुंब्र्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख याचा मृत्यू झाला, तर या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मुंब्रा पोलिसांनी त्याला गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रासह अटक केली.

महिनाभरात दुसरी घटना
महिनाभरात मुंब्रा परिसरातील ही दुसरी तर ठाणे शहरातील तिसरी गोळीबाराची घटना असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. मुंब्र्यासह ठाण्यात नेमके चालले काय, असा सवाल ठाणेकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा तपास मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com