ठाणे जिल्ह्यात आपत्तीचे धडे

ठाणे जिल्ह्यात आपत्तीचे धडे
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : जिल्ह्यातील विविध भागांत पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावला आहे. आपत्तीच्या काळात कशा प्रकारे मदतकार्य जलद गतीने पोहोचेल, याचे प्रशिक्षण स्थानिक यंत्रणांना देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मध्यातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी १ ते १५ एप्रिल या कालावधीत परिचय सराव कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक सत्रात २०० प्रशिक्षणार्थी सहभागी होतील. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे एकूण २५ अनुभवी अधिकारी; तसेच कर्मचारी ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये एक राजपत्रित अधिकारी, दोन दुय्यम अधिकारी आणि २२ अन्य पदांच्या जवानांचा समावेश आहे. ही तुकडी जिल्ह्यातील विविध महापालिका क्षेत्रांत आणि ग्रामीण भागात जाऊन स्थानिक यंत्रणेला प्रशिक्षित करणार आहे.
ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी या उपक्रमाच्या नियोजनासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार स्थानिक स्वयंसेवक, नागरी संरक्षण दल, पोलिस पाटील आणि आपदा मित्र-सखी सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.

.............................
या ठिकाणी प्रशिक्षण
२ एप्रिल : नवी मुंबई महापालिका (मुख्यालय सभागृह),
४ एप्रिल : उल्हासनगर महापालिका (सिंधू भवन ऑडिटोरियम),
६ एप्रिल : ठाणे महापालिका (नरेंद्र बल्लाळ हॉल),
७ एप्रिल : मिरा-भाईंदर महापालिका (नगर भवन, भाईंदर प.),
८ एप्रिल : भिवंडी निजामपूर महापालिका (राजय्या गाजेगी हॉल),
९ एप्रिल : तहसीलदार कार्यालय शहापूर (शेतकी भवन),
१० एप्रिल : कल्याण-डोंबिवली महापालिका (बिर्ला कॉलेज, कल्याण),
१३ एप्रिल : तहसीलदार कार्यालय, मुरबाड (एमआयडीसी सभागृह),
१५ एप्रिल : तहसीलदार कार्यालय अंबरनाथ (आदर्श हायस्कूल, बदलापूर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com