

स्नेहा दुबे चिमुकल्याच्या भेटीला
वसईतील हल्ला प्रकरणात कारवाईची मागणी
विरार, ता. २ (बातमीदार) ः वसई परिसरातील चार वर्षांच्या निष्पाप बालकावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या घटनेप्रकरणी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी जखमी बालकाची तसेच त्याच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विघ्नेश कोंढारेला झालेल्या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी या घटनेची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषी व्यक्तीला शिक्षा करण्याची मागणी केली आहे. विघ्नेशवर उपचार करणारे डॉ. अंकित गुप्ता यांच्याशी चर्चा करताना बालकाची विशेष काळजी घेण्याच्या सूचना वैद्यकीय पथकाला दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.