

लहान रस्ते, घरगल्ल्यांच्या साफसफाईसाठी वाहने तैनात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मुंबईतील दाट लोकवस्तीच्या विभागात साफसफाईवर पालिकेने अधिक लक्ष दिले आहे. लहान रस्ते आणि घरगल्ल्यांची सफाई अधिक चांगली ठेवण्यासाठी पालिकेने छोट्या गाड्या तैनात केल्या असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
दाट लोकवस्तीच्या ठिकाणी तसेच झोपडपट्ट्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होते. तो नियमित उचलला जात नसल्याच्या सातत्याने स्थानिकांच्या तक्रारी येतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कामगार आणि वाहने आता पालिकेने उपलब्ध केली आहेत. दाटीवाटीच्या वस्त्यांसाठी ही वाहने छोट्या रस्त्यांवर चालविण्यात येत आहेत. त्यामुळे कचऱ्याची साफसफाई करणे सुलभ झाले आहे.
मुंबईत जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी आता नवीन बंदिस्त गाड्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. बंदिस्त गाड्यांमुळे कचरा रस्त्यावर पडणार नाही. रस्त्यावर घाण होत नसल्याचे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने गाड्या दाखल होणार असल्याचे पालिकेने सागितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.