ठाण्यात जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला

ठाण्यात जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला
Published on

स्लॅब कोसळून वृद्ध महिला जखमी
ठाणे : माजिवडा परिसरातील वेलंकनी बिल्डिंगमध्ये गुरुवारी स्लॅब कोसळला. यात किर्ती कवीलकर (वय अंदाजे ७०) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच ही इमारत सी२ए (धोकादायक) प्रवर्गातील असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिलेल्या माहितीनुसार, तळ अधिक ३ मजली, सुमारे ३० ते ३५ वर्षे जुन्या वेलंकनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रूमचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेत किर्ती कवीलकर यांना किरकोळ मार लागला. या इमारतीतील १२ सदनिकांमध्ये ४० ते ४५ रहिवासी राहत होते. त्यापैकी १२ ते १५ जणांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित बांधकाम धोकादायक असल्याने इमारत सीलबंद करण्यात आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com