हनुमान जयंतीला १२ हजार भक्तांची उपस्थिती

हनुमान जयंतीला १२ हजार भक्तांची उपस्थिती
Published on

हनुमान जयंतीला १२ हजार भक्तांची उपस्थिती

बोईसर, ता. २ (वार्ताहर) : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोईसरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली. या शोभायात्रेत १२ हजारांहून अधिक भक्त सहभागी झाले होते.
संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले असून, ‘जय श्रीराम’ व ‘जय हनुमान’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. भक्तिगीतांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीचे नागरिकांनी ठिकठिकाणी फुलवृष्टी करून स्वागत केले. व्यापारी व नागरिकांनी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. या वेळी भगवान श्रीराम, हनुमान तसेच महापुरुषांच्या आकर्षक झांक्यांद्वारे धार्मिक संदेश देण्यात आला. दरम्यान, आयोजकांनी २५१ कुटुंबांतील ६०० हून अधिक व्यक्तींची ‘घरवापसी’ झाल्याचा दावा केला. स्थानिक नागरिक, युवक व महिलांच्या मोठ्या सहभागामुळे हा उपक्रम सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com