स्पा मध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस

स्पा मध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस
Published on

स्पामध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा रोड येथील एका स्पामध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी उघडकीस आणला आहे. या वेळी भारतीय व विदेशी १४ तरुणींची सुटका करण्यात आली असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिरा रोडच्या तनिष्क स्पामध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांसह गुरुवारी (ता.२) सायंकाळी स्पावर छापा टाकला. त्या वेळी त्या ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी या व्यवसायात अडकलेल्या थायलंड व भारतीय अशा १४ तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना अटक करून त्यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com