

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना मोठी मागणी दिसून येत आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण महिला बचत गटांना आपल्या कलेचे आणि उत्पादनांचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
प्रदर्शनात महाराष्ट्राच्या चांद्यापासून ते बांध्यापर्यंतच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजिकांनी येथे आपल्या कौशल्याचे प्रदर्शन मांडले आहे. यात हस्तकला, हँडलूम, घरगुती खाद्यपदार्थ; तसेच पारंपरिक वस्तूंचा समावेश असून हे प्रदर्शन ५ एप्रिलच्या रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आई योजनेची विशेष जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी मोहिमा सावळा आणि सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन कोकण विभागातील स्टॉल्सची पाहणी केली आणि महिला उद्योजकांशी थेट संवाद साधला.
पर्यटन क्षेत्रात स्वरोजगाराच्या संधी
पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी आई ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटनाशी संबंधित व्यवसायांसाठी बिनव्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच, महिलांनी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास त्यावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाची रक्कम सरकारमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना पर्यटन क्षेत्रात स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा आर्थिक भार कमी करणे हा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.