अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त
Published on

प्रवेशबंदीची पायमल्ली
अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी
पालघर, ता. ३ ः सकाळच्या गर्दीच्या वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे कोंडीची समस्या गंभीर झाली असून, रोजच्या प्रवासात नागरिकांची दमछाक होत आहे. अलीकडच्या काळात शहरात अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते अवजड वाहनांची वर्दळीमुळे त्रासदायक ठरत आहेत. विशेषतः शाळा, कार्यालयीन वेळेत अशा वाहनांमुळे लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी, वेळ वाया जात असून, आपत्कालीन सेवांना अडथळे निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, अवजड वाहनांमधून माती, मुरूम, खडी नियमानुसार होत नसल्याने दुचाकी वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खडी-मातीमुळे वाहनांचे संतुलन बिघडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
-------------------------
कडक कारवाईची गरज
- पालघर शहराच्या मुख्य रस्त्यांवर दुपारी १२ वाजेपर्यंत अवजड वाहनाना बंदी आहे. तसा नियम वाहतूक शाखेने काढला आहे. मात्र, अवजड वाहनांकडून नियमांना तिलांजली दिली जात आहे.
- सकाळच्या वेळेत अवजड वाहनांवर कडक कारवाई करावी, नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे तसेच वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com