

ठाणे, ता. ३ : वर्तकनगर येथील अशर मेट्रो टॉवरमधील हरिओम स्वीट्स या दुकानात शुक्रवारी (ता. ३) सकाळी ९.१८च्या सुमारास इन्व्हर्टरच्या बॅटरीला आग लागल्याची घटना समोर आली. आगीत इन्व्हर्टर बॅटरी, इलेक्ट्रिक वाहिन्या, कागदी पुठ्ठे व लाकडी कपाट जळून नुकसान झाले. ही इमारत तळ अधिक ३० मजली असून, तळमजल्यावर हितेश चौधरी यांच्या मालकीचे दुकान आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महावितरण व वर्तकनगर पोलिसांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.