खैर झाडांच्या तोडप्रकरणी दोघांना अटक

खैर झाडांच्या तोडप्रकरणी दोघांना अटक
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : खैर झाडांची बेकायदा तोड, वाहतूक व साठा प्रकरणात दहशतवादी पथकाने साहिल चिखलेकर (वय ३६) व आकिब साकीब नाचण (वय ३६) या दोघांना अटक केली आहे. ठाणे बेकायदा कृती प्रतिबंधक विशेष तथा मोक्का न्यायालयाने या दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी गुरुवारी सुनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.
८ जुलै २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत पडघा (भिवंडी) ते लांजा (रत्नागिरी) दरम्यान आरोपींनी संगनमत करून कोणताही परवाना नसताना खैर झाडांची तोड करून लाकडाचा साठा व वाहतूक केल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात सुफियान नाचण, इम्तियाज बरमारे व मेहताब शेख यांना अटक झाली होती; मात्र ते सध्या जामिनावर मुक्त आहेत. याच
दरम्यान, साहिल व आकिब या दोघांना २९ मार्चला अटक केली. दोघांना न्यायालयाने २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. गुरुवारी त्यांना ठाणे बेकायदा कृती प्रतिबंधक विशेष तथा मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश विश्वास मोहिते यांच्या न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांच्या घरांची झडती घेतली असता कोणताही मुद्देमाल आढळला नाही. या प्रकरणाचा तपास ठाणे दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त-३ चे विजय पाटील हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com