

जव्हारकरांच्या नशिबी पायपीट
एसटी बसचा मार्ग बदलल्याने मनस्ताप
जव्हार, ता. ३ (बातमीदार) ः शहरातून एसटीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाच बत्ती, यशवंतनगर मोर्चा, भट्टीपाडा, गांधी चौक, तारपा चौक, मुकणे कॉलनी परिसरातील नागरिकांना दोन महिन्यांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गावातील निर्धारित थांब्याऐवजी एसटी बस बाह्यवळण मार्गाने धावत आहे. थांब्यांवरील प्रवाशांना एसटी स्टँडपर्यंत पोहोचण्यासाठी पायी जावे लागते किंवा रिक्षा भाड्याने घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून वेळेचा खोळंबा होत आहे. अनेक वेळा रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या बस चुकतात. घाईगडबडीत पायी धावत बस आगारात जाण्याच्या प्रयत्नात आबालवृद्ध तसेच महिलांची धावपळ होत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
-------------------------------------
आर्थिक भुर्दंड
जव्हारमध्ये एसटीतून येण्याचे झाल्यास गावाबाहेरून यावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या काही कामानिमित्त पोहोचण्याकरिता पायपीट करावी लागत असल्याने वेळ जात आहे व आर्थिक भुर्दंड बसत आहे.
--------------------------------
नगर परिषद शहर विकासासाठी काही कामे करत आहेत. ती कामेही अतिशय संथ गतीने होत आहेत. परिणामी, एसटी बस बायपास मार्गाचा वापर करत असल्याने पायपीट करावी लागत आहे.
- विशाखा अहिरे, महिला प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.