केडीएमसीत स्थायी समितीवर शिवसेनेची पकड

केडीएमसीत स्थायी समितीवर शिवसेनेची पकड
Published on

कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा शिवसेनेकडेच राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सारिका जाधव यांनी, तर शिक्षण मंडळ सभापतिपदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजित थरवळ यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. केडीएमसी मुख्यालयातील सचिव कार्यालयात हे अर्ज दाखल करण्यात आले. या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संबंधित उमेदवारांची निवड बिनविरोध मानली जात आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान करण्यात येणार आहे. या वेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सभागृह नेते वरुण पाटील यांच्यासह शिवसेना-भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com