लाखोंचे कचरा विघटन प्रकल्प विनावापर

लाखोंचे कचरा विघटन प्रकल्प विनावापर
Published on

दिवेआगरचा प्रकल्प ‘कचऱ्यात’
लाखोंचा निधी पाण्यात; दोन प्रकल्प बंदावस्थेत
श्रीवर्धन, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उद्‍घाटन झाल्यापासूनच धूळखात पडला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकल्पाचे साधे चाकही फिरलेले नाही. परिणामी, ग्रामपंचायतीचे लाखोंचा निधी पाण्यात गेला असून, प्रकल्पच कचऱ्यात गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा वार्षिक नियोजनामधून नागरी सुविधा अंतर्गत दिवेआगर येथे कचरा विघटन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ५० लाख एवढी अंदाजित रक्कम होती, तर त्यापैकी बारा टक्के ही ग्रामपंचायतने द्यायची होती. प्रकल्पाचे उद्‍घाटन २९ ऑक्टोबर २०२३ रोजी खासदार सुनील तटकरे व आमदार आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले होते, परंतु दोन वर्षे उलटूनही या ठिकाणी कचऱ्याचे एकदाही विघटन झाले नाही. कचऱ्याचे विलगीकरण करून गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी हा त्यामागचा उद्देश होता, परंतु सध्या या ठिकाणी आता संरक्षण भिंतीचे कुंपण भग्नावस्थेत असून, सर्व साहित्याला गंज लागला आहे. एकूणच हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आणखी निधी खर्च होण्याची शक्यता आहे.

१६ लाखांचा प्लॅस्टिक प्रकल्पही बंदच
रायगड जिल्हा परिषदेने १६ लाखांचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पदेखील २०२४ मध्ये उभारला. मात्र, हा प्रकल्पदेखील बंदावस्थेत आहे. यासंबंधित तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून दिवेआगर येथे हे प्रकल्प उभारले होते. मात्र, ते अद्याप का बंद आहे याची माहिती घेऊन सांगतो, असे श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी राजेंद्र किरवे यांनी सांगितले आहे.

कचरा विघटन प्रकल्प हा सुरू करण्याचे प्रयत्न होते. मात्र, निवडणूक, आचारसंहिता व इतर प्रशासकीय अडचणींमुळे ते राहून गेले. सध्या ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांची पोटनिवडणूक झाल्यावर चर्चा करू.
- वसीम फकजी, सरपंच, दिवेआगर


सोबत फोटो -
श्रीवर्धन : दिवेआगर येथील कचरा विघटन प्रकल्पच कचऱ्यात गेल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com